लहान-मोठ्या आजारपणात, ‘घरी उपचार सुरु असतांना’ किंवा ‘हॉस्पिटलमधून घरी आल्यावर अल्पशा काळासाठी’, रुग्णोपयोगी विविध साधनांची गरज भासते. अल्पशा काळासाठी व/वा जास्त किंमतीची साधने विकत घेणे व्यवहार्य नसते. गरजू रुग्णांना अशी साधने उपलब्ध होण्यासाठी, ‘स्व. देवचंद कांबळे फाऊंडेशन’ तर्फे ‘रुग्णोपयोगी साधने उपलब्धता’ उपक्रम सुरु करत आहोत. या ठिकाणी, नि:शुल्क / नाममात्र शुल्क आकारून (अनामत रक्कम घेऊन) सदर साधने उपलब्ध करून दिली जातील.या उपक्रमासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करावे ही विनंती.
आपण यापैकी कोणत्याही मार्गाने सहकार्य करू शकता. >>
या उपक्रमाची औपचारिक तयारी आपण १ जून २०२१ पासून सुरु करत आहोत.किमान आवश्यक गोष्टींची, लवकरात लवकर सोय करून जनसामान्यांसाठी सेवा सुरु करण्यात येईल.
आपणही या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा. आणि/किंवा उपक्रमास शक्य त्या इतर स्वरूपात मदत करा. ही विनंती !
संपर्क: